छत्रपती संभाजीनगर शहरातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत घुसून मोबाइल आणि अन्य महागड्या वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या मालेगावच्या टोळीला जवाहरनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून कुकरी, चाकू, फायटर, कार आणि चोरीचे ८ मोबाइल यासह ३.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद सैझाद शेख, शेख इमरान शेख अजीज, उमर फारूख शेख रफिक, शेख लतीफ शेख अतीक, मोहंमद मोसीन अब्दुल हमीद शेख आणि अरबाज शेख फिरोज शेख (सर्व रा. मालेगाव) यांचा समावेश आहे.

सावे-जलील लढतीकडे शहराचे लक्ष

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी एसएफएस स्कूलमध्ये पार पडली. भाजपचे अतुल सावे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यातील चुरशीची लढत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. निकाल जाहीर झाल्यानंतर अतुल सावे यांचा विजय झाल्याचे समजताच मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

याच गोंधळाचा फायदा घेत टोळीने समर्थकांच्या गर्दीत घुसून मोबाइल चोरी करण्यास सुरुवात केली. यावेळी एका संशयिताला बंदोबस्तावरील पोलिसांनी पाहिले. पोलिसांना पाहून तो पळाला आणि एका कारमध्ये बसून निघून गेला.

पोलिसांचा वेगवान पाठलाग

पोलिसांनी तत्काळ कारचा पाठलाग सुरू केला. उपनिरीक्षक मारोती खिल्लारे आणि त्यांच्या पथकाने सिडको चौक, बसस्थानक मार्गे हर्सूल टी पॉइंटपर्यंत पाठलाग करून कारला रोखले. कारची तपासणी करताना त्यामध्ये ८ मोबाइल आणि धारदार शस्त्रे सापडली.

गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक

या प्रकरणामुळे निवडणूक मिरवणुकांदरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. जवाहरनगर पोलिसांनी केलेल्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे कौतुक होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

555 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क