जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत ९ मतदारसंघांत रिंगणात असलेल्या १८३ उमेदवारांपैकी तब्बल १६३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार, निवडणुकीत वैध मतांच्या किमान एकषष्ठांश मते न मिळाल्यास उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते. यंदा केवळ २० उमेदवारांना ही किमान मते मिळवता आली.
डिपॉझिट जप्त होण्याचे कारण
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, निवडणूक आयोगाकडे उमेदवारांनी ठराविक अनामत रक्कम भरावी लागते. सर्वसाधारण उमेदवारांसाठी ही रक्कम १०,००० रुपये तर अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांसाठी ५,००० रुपये असते. उमेदवाराला मतदान झालेल्या मतांपैकी किमान एकषष्ठांश मते मिळाल्यासच त्यांचे डिपॉझिट परत मिळते.
मतदारसंघनिहाय डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या:
- सिल्लोड – २२
- कन्नड – १३
- फुलंब्री – २५
- औरंगाबाद मध्य – २१
- औरंगाबाद पश्चिम – १६
- औरंगाबाद पूर्व – २७
- पैठण – १५
- गंगापूर – १६
- वैजापूर – ०८
उमेदवारांचे अपयश
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांना अपेक्षित मते मिळवण्यात अपयश आले आहे. निवडणूक निकाल हे जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब मानले जात असल्याने डिपॉझिट जप्त होणे हे उमेदवारांसाठी मोठे धक्कादायक ठरले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*