सेव्हन हिल उड्डाणपुलावर मंगळवारी (दि. २६) संध्याकाळी एका तरुणीने वडिलांच्या समोरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत तिचा पाय मोडला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रणिता (काल्पनिक नाव), बी. फार्मसीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. शनिवारी (दि. २३) ती आपल्या मित्राच्या वाढदिवसाला न सांगता गेली होती. या घटनेचे फोटो पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी राग व्यक्त केला. यावरून तिच्या मित्रानेही तिच्याशी बोलणे बंद केले. या गोष्टीने त्रस्त होऊन प्रणिताने वडिलांना फोन करून आत्महत्येची कल्पना दिली.
“मी घरी कधीच येणार नाही. तो माझ्याशी बोलत नाही,” असे वडिलांना सांगून प्रणिता सेव्हन हिल उड्डाणपुलावर थांबली. काळजीपोटी वडील तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, वडिलांना पाहताच प्रणिताने पुलावरून खाली उडी घेतली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली असून तिचा पाय मोडला आहे.
जखमी प्रणितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
पालकत्व आणि संवादाची गरजः
प्रेमभंगाच्या धक्क्याने तरुणाई भावनात्मकदृष्ट्या अस्थिर होत आहे. पालक आणि मुलांमधील संवाद टिकवून ठेवणे, त्यांना समजून घेणे आणि मानसिक आधार देणे अत्यावश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*