पैठण तालुक्यातील आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मभूमीत मंगळवारपासून किरणोत्सव सोहळ्याला भव्य उत्साहात सुरुवात झाली. कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, मंगळवारी दुपारी १२ वाजून ५२ मिनिटांनी माउलींच्या मुखावर सूर्यकिरण पडताच जयघोष करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आणि गुरुवारी समाधी सोहळ्याच्या वेळीही सूर्यकिरण माउलींच्या मुखावर पडून भक्तांना संजीवन दर्शनाचा अनुभव होईल.
गेल्या तीन वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचा मिलाफ असलेल्या किरणोत्सवाचा अनुभव भाविक घेत आहेत. माउलींच्या जन्मभूमीचे हे अनोखे वैशिष्ट्य पाहण्यासाठी तालुक्यातील आणि राज्यभरातील हजारो भाविक आपेगाव येथे येत आहेत.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या मूर्तीवर पडणारी सूर्यकिरणे अध्यात्मिक उर्जा आणि वास्तुशास्त्राचा सुंदर संगम असल्याचे मानले जाते. हा किरणोत्सव भक्तांसाठी केवळ एक सोहळा नसून श्रद्धा आणि अध्यात्माची प्रेरणा देणारा अनमोल क्षण ठरतो.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*