सुनील झिंझुर्डे /गंगापूर (प्रतिनिधी) : महाशिवपुराणाचे श्रवण केल्याने मानवी जीवनात मोक्षप्राप्ती होते आणि सद्गती प्राप्त होते, असा संदेश पंडित राघवजी प्रदीपजी मिश्रा यांनी दिला. वेरुळ येथे आयोजित महाशिवपुराण कथेच्या पाचव्या दिवशी कथा श्रवण करणाऱ्या शिवभक्तांना ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी लासूर स्टेशन येथील घृष्णेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने पंडित मिश्रा यांना ३० फूट लांब पुष्पहार अर्पण करून गुरुपूजन करण्यात आले.
कथेच्या मंचावर टाका आश्रमचे स्वामी श्री. श्री. विद्या वामदेव तीर्थ, वासुदेव सरस्वती, भरत महाराज शास्त्रीजी, प. पू. गजानन बापूजी आदी संत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक सोपान नारखेडे व हितेश नारखेडे यांच्यासह सुनील औटे, विशाल शेठ मुंदडा, रतन जानराव, कैलास हिंगमिरे, संतोष पाटील, गुलाब वाघ, रामकृष्ण हाडके, गोविंद मुंदडा, विजय डोके, बाबासाहेब सोमासे आदी शिवभक्त उपस्थित होते.
शिवभक्तांची उत्साही उपस्थिती
कथेच्या दरम्यान शिवभक्तांनी फुलांची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. फुगडी खेळत, शिवनामाच्या गजरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या कथेचे आयोजन केवळ वेरुळपुरते मर्यादित न राहता कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर आदी भागांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
महाशिवपुराण कथा ग्रामीण भागातील लोकांसाठी आध्यात्मिक उर्जाचा स्रोत ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*