मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्षाचे नेते मिळून हा निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. एका लग्न समारंभासाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे आले असताना त्यांनी ही माहिती दिली.
फडणवीस म्हणाले, “आधी मुख्यमंत्री ठरवला जाईल, त्यानंतर इतर मंत्र्यांची नावे निश्चित होतील.” तिन्ही पक्षांमध्ये चर्चेचा शेवटचा टप्पा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होईल.
ईव्हीएमबाबत विरोधकांचा रडीचा डाव – फडणवीस
ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन)मध्ये गडबड असल्याच्या विरोधकांच्या आरोपांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने याबाबत विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. तुम्ही हरले तर ईव्हीएम खराब, हा प्रकार आता थांबवायला हवा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहे आणि ही प्रणाली सुरूच राहील.”
स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत अद्याप निर्णय नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की आघाडीसोबत, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. यासाठी योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राजकीय घडामोडींवर आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे, तर भाजप व सहयोगी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेची अंतिम फेरी सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*