महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ अत्याधुनिक म्युझियम उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे म्युझियम छत्रपती संभाजीनगर शहरातील आमखास मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीत उभारले जाणार आहे. या म्युझियमची उभारणी दिल्ली येथील पीएम मोदी म्युझियमच्या धर्तीवर केली जाईल. मनपा प्रशासकांनी या म्युझियमच्या निर्मितीसाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाला जबाबदारी दिली आहे.
प्रत्येक वर्षी शहरात येणाऱ्या लाखो पर्यटकांच्या मागणीला प्रतिसाद देत, प्रशासकांनी तीन म्युझियम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या म्युझियममध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दालन, छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियमचा समावेश असेल. सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या निधीतून आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीत हे म्युझियम उभारले जाणार आहे, जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंतर्गत सुशोभीकरण होईल.
या म्युझियममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती पर्यटकांना मिळेल आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवले जातील.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*