Oplus_131072

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शहरातील तेजस्वी देशपांडे हिने देशभरातून ९९ वा क्रमांक पटकावत संपूर्ण शहराचा मान उंचावला आहे. ठाम निर्णय, प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर तिने तिसऱ्या प्रयत्नात हे घवघवीत यश मिळवले आहे.

उस्मानपुरा परिसरात राहणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या मनोविकृती विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद देशपांडे आणि डेंटिस्ट डॉ. गौरी देशपांडे यांची कन्या तेजस्वीचा निकाल समजताच तिच्या घरी नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांनी भेटीचा ओघ सुरू केला.

तेजस्वीने आपले शालेय शिक्षण नाथ व्हॅली स्कूल, कांचनवाडी येथे पूर्ण केले असून अकरावी-बारावीचे शिक्षण तिने वाणिज्य शाखेतून घेतले. पुढे नवी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून बीए ऑनर्स (इकॉनॉमिक्स) पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. कोरोनाकाळात शहरात परतून दोन वेळा अपयशाचा सामना करत तिने बेंगळुरूमध्ये प्रशिक्षण घेत पुन्हा तयारी सुरू ठेवली. मुख्य परीक्षा तिने तेथूनच दिली आणि मुलाखतीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन तयारी केली.

तीनही टप्प्यांत यश मिळवून ९९ वा रँक मिळवणाऱ्या तेजस्वीने नववीत असतानाच प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. नाथ व्हॅलीचे प्राचार्य डॉ. रणजित दास हे तिचे प्रेरणास्थान ठरले. बारावीत कॅप्टन म्हणून नेतृत्व करत असताना तिला “बेस्ट ह्युमन बींग” पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

तेजस्वी ही केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडाक्षेत्रातही अग्रगण्य आहे. बास्केटबॉल क्रीडा प्रकारात दिल्ली विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत तिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. या खेळामुळेच अपयश पचवण्याची ताकद मिळाली, असे ती म्हणते.

“यश मिळाल्याने आनंद आहेच पण त्यासोबतच आता एक प्रकारचा हळूहळू रिलीफ वाटतोय. परीक्षा कठीण आहे, पण चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर यश मिळतेच. स्पर्धा परीक्षेत उतरणाऱ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यावी, इतरांना दाखवण्यासाठी नव्हे,” असा संदेश तेजस्वीने दिला.

तिच्या यशामागे कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. मुलाखतीची तयारी डेंटिस्ट डॉ. अभिजित मोहखेडकर यांनी करून घेतली. तर आई-वडिलांनी तिला सहा प्रयत्नांची तयारी mentally करून दिली होती, असे देशपांडे कुटुंबियांनी सांगितले.

नैसर्गिक क्षमता ओळखून दिशा निवडा

“या क्षेत्रात यश हवे असेल तर मुलांनी आपली नैसर्गिक क्षमता ओळखून योग्य दिशा निवडली पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शन घ्या, व्यक्त व्हा आणि प्रयत्न सोडू नका,” असा सल्ला डॉ. प्रसाद देशपांडे यांनी दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

982 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क