आजचे राशीभविष्य शुक्रवार 28 मार्च 2025:
मेष (Aries): आज तुम्हाला तुमच्या इच्छित जीवनसाथीची भेट होईल. काही जुन्या इच्छा पूर्ण होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नवीन मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवाल. व्यवसाय योजना यशस्वी ठरेल. नोकरीत आनंदात वाढ होईल. समाजात तुमच्या चांगल्या कामांची चर्चा होईल.
वृषभ (Taurus): बिघडलेली कामे पूर्ण होतील. वाहनांच्या खरेदी-विक्रीत लाभ होईल. लांबचा प्रवास अनुकूल ठरेल. पुनर्बांधणीची योजना आकार घेईल. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
मिथुन (Gemini): तब्येत उत्तम राहील. कोणत्याही रोगाची भीती मनातून निघून जाईल. कुटुंबात आनंददायी घटना घडेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा.
कर्क (Cancer): मौजमजेकडे अधिक कल राहील. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. स्त्री सौख्यात वाढ होईल. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. जोडीदाराविषयी मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो.
सिंह (Leo): कुटुंबातील सदस्यांमधील तणाव दूर होईल. परस्पर प्रेम आणि विश्वास वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होईल. राजकीय क्षेत्रात जनतेचा पाठिंबा आणि साहचर्य मिळाल्याने मनोबल वाढेल.
कन्या (Virgo): एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊ शकतात. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढेल. उगाचच निरुत्साही वाटेल. आळस झटकून टाकावा.
तूळ (Libra): मानसिक गोंधळ दूर सारावा. फार काळजी करत बसू नका. लेखक वर्गाला चांगला लाभ मिळेल. बौद्धिक डावपेच खेळाल. सूचक स्वप्न पडू शकेल.
वृश्चिक (Scorpio): संभाषणाची आवड जोपासाल. घरी नातेवाईक गोळा होतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. नवीन मित्र जोडले जातील. प्रवासात खर्च वाढू शकतो.
धनु (Sagittarius): कौटुंबिक गोष्टींचे भान राखावे. लेखक, प्रकाशक यांना चांगला लाभ होईल. लहान प्रवासाचा योग येईल. सर्व बाबी औत्सुक्याने जाणून घ्याल. काही गोष्टींचे मनन करावे.
मकर (Capricorn): प्रकृतीची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च करू नका. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. हातातील कामात अधिक लक्ष घालावे.
कुंभ (Aquarius): चौकसपणे गोष्टी समजून घ्याल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग कराल. भावना उत्तम प्रकारे मांडाल. घरगुती जबाबदारी वाढेल. कामाचे योग्य नियोजन करावे.
मीन (Pisces): काहीसा थकवा जाणवेल. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल.
टीप: राशीभविष्य हे मार्गदर्शनात्मक असते आणि आपल्या प्रयत्नांनुसार जीवनात बदल घडवता येतात.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*