छत्रपती संभाजीनगर: बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू जनजागरण समितीतर्फे मंगळवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज मार्गदर्शन करणार आहेत.
कडक पोलीस बंदोबस्त:
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापक बंदोबस्त केला आहे. २ पोलिस उपायुक्त, ३ एसीपी, १५ पोलिस निरीक्षक, ४० पीएसआय आणि २४० पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ६ ड्रोन कॅमेरे, दंगा काबू पथक, आणि १० राखीव स्ट्रायकिंग फोर्सही सज्ज ठेवण्यात आले आहेत. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनाही बंदोबस्तासाठी सहभागी करण्यात आले आहे.
वाहतूक मार्गात बदल:
आंदोलनामुळे चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पंचायत समितीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून शहागंज चौक, चंपा चौक, गणेश कॉलनी, टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर, दिल्ली गेट, आणि अण्णाभाऊ साठे चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
हिंदू जनजागरण समितीच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*