छत्रपती संभाजीनगर : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांच्या विरोधात हिंदू जनजागरण समितीतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी आपली परखड भूमिका मांडली.

रामगिरी महाराज म्हणाले की, “बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार हे निंदनीय आहेत. 1971 मध्येही असेच अत्याचार झाले होते, जिथे 35 लाख महिलांवर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी आपण बांगलादेशला स्वतंत्र केले, मात्र आज तिथेच हिंदूंवर अन्याय होत आहे. ज्या इस्कॉन मंदिरांनी कोरोनाच्या काळात गरजूंना अन्न दिले, त्याच हिंदू मंदिरांवर आता हल्ले होत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “सनातन धर्म हा कुणा धर्माचा द्वेष करत नाही, पण अन्यायाच्या विरोधात लढा देणे हे आपले कर्तव्य आहे. भगवद्गीतेतही सांगितले आहे की अन्याय सहन करणे योग्य नाही. सनातन धर्म हा जगात एकमेव धर्म आहे; बाकी सर्व फक्त पंथ आहेत.”

सनातन एकत्र आल्यास विश्व उलथापालथ करू शकतो

रामगिरी महाराज यांनी सनातन धर्माच्या ताकदीवर भर देत सांगितले की, “सनातन धर्माचे अनुयायी जागरूक झाले, तर जगातील कोणतेही मोठे बदल घडवून आणू शकतात. आपण अमेरिकेचा अध्यक्षही निवडू शकतो.” त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, “बांगलादेशातील अत्याचार थांबले पाहिजेत. जर आपण सावध राहिलो नाही, तर अशा घटना आपल्या देशातही घडू शकतात. हिंदूंना भारतात आश्रय देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा.”

बांगलादेशातील अत्याचारांचा तीव्र निषेध

हिंदू जनजागरण समितीने बांगलादेशातील हिंदूविरोधी हल्ल्यांचा तीव्र निषेध करत जागतिक स्तरावर याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू समाजात एकात्मतेचा संदेश दिला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

837 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क