वैजापूर: महाराष्ट्राच्या ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी (१६ डिसेंबर) सायंकाळी ७ वाजता वैजापूरजवळील चॅनल नंबर ४८० येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ही कार संभाजीनगरहून शिर्डीकडे जात होती. गाडीचा टायर गरम होऊन फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.
घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह असरा फाउंडेशनच्या सेवकांनी तत्काळ धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातातील सर्व प्रवासी मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*