छत्रपती संभाजीनगर : छायाचित्रकार म्हणून ओळख असलेल्या सोहम नानासाहेब उगले (वय २५, रा. देवळाई, मूळ रा. चिकलठाण, ता. कन्नड) याने हसूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. रहिवाशांना सकाळी तलावात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हसूल पोलिस ठाण्याचे अंमलदार पोपट दहीफळे व अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.

सोहम हा मूळचा कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील रहिवासी होता. तो सध्या आईसोबत देवळाई परिसरात वास्तव्यास होता. वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्यापासून त्याने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने छायाचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. व्हिडीओ व फोटो एडिटिंगमध्ये तो पारंगत होता.

रविवारी सायंकाळी त्याने काम असल्याचे सांगून घर सोडले. सायं. ७:३० पर्यंत काही सहकारी छायाचित्रकारांसोबत वेळ घालवून नंतर तो एकटाच निघून गेला. त्यानंतर बहिणीचे दोन कॉल त्याने रिसिव्ह केले नाहीत आणि काही वेळात त्याचा मोबाइल बंद झाला.

रविवारी सायंकाळी सोहमने बहिणीच्या मुलांना चॉकलेट व फुगे घेऊन दिले होते. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलच्या सीमकार्डमधून ओळख पटविण्यात आली. सध्या पोलिस तपास सुरू असून मोबाईल तपासणीनंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, असे पो. अं. पोपट दहीफळे यांनी सांगितले. काही दिवसांपासून तो तणावाखाली असल्याचेही सांगण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,888 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क