गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

 

 

ही घटना सोमवार, १२ मे रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. संजय जयसिंग घुनावत (वय ५५, मूळ रा. वाळूजवाडी, ता. गंगापूर, सध्या रा. शिवाजी नगर, वाळूज) हे आपल्या स्कूटर (क्र. एमएच २० एचई ०६३०) वरून कामगार चौकातून वाळूजकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रक (क्र. एमएच २६ एडी ४९९५) ने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कूटर ट्रकखाली गेल्याने घुनावत यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघातग्रस्त ट्रक आणि स्कूटर ताब्यात घेतली आहेत.

या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,213 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क