{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंज टोलनाक्यावर इलेक्ट्रिशीयनने साथीदाराच्या मदतीने कार्यालयातील २ लाख १८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. १० मे) मध्यरात्री एकच्या सुमारास घडला.

चोरीप्रकरणी ज्ञानेश्वर भगवान फुलारे (२३, रा. कदीम टाकळी, ता. गंगापूर) आणि त्याचा एक अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर फुलारे हा गेल्या दोन वर्षांपासून माळीवाडा इंटरचेंजवर इलेक्ट्रिशीयन म्हणून कार्यरत होता. त्यामुळे त्याचा टोल कार्यालयातील अकाउंट रूममध्ये मोकळा वावर होता. घरची परिस्थिती हालाखीची असल्याचे सांगून त्याने इतर कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला होता.

शनिवारी टोलनाक्यावर जमा झालेली रक्कम नागपूरला पाठविण्यासाठी लेखा विभागाने पॅक करून ठेवली होती. ही माहिती फुलारेला होती. त्यानुसार त्याने शुक्रवारी रात्री आपल्या मित्राला चोरीसाठी बोलावून घेतले. ज्ञानेश्वरने मित्राला आत पाठवले आणि स्वतः बाहेर पहारा देत होता.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर टोल व्यवस्थापक संजय लांडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,132 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क