केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्दयी खून करण्यात आल्याने मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला तात्काळ अटक करण्याची मागणी करत सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या नेतृत्वाखाली आवाज उठवत आहे.
या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत, मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले असून, नुकतेच मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांना या प्रकरणात जबाबदार धरले जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्यावर प्रचंड छळ केल्यानंतर त्यांचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
“सरकारने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा”
मराठा समाजाने सरकारला हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा छत्रपती संभाजीनगरमधून विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच धनंजय मुंडे आरोपींची पाठराखण करत असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
“मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे!”
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सरकारने तातडीने दखल घेऊन वाल्मीक कराड याला अटक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यावर जर सरकारने दुर्लक्ष केले, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटवले जाईल, असा इशारा मराठा समाजाने पत्रकार परिषदेत दिला आहे.
सरकारने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सकल मराठा समाजाची मागणी पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*