Oplus_131072

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे साम्राज्य चव्हाट्यावर आले असून, या परिस्थितीत बीडच्या पोलिस अधीक्षकपदी 2017 बॅचचे आयपीएस अधिकारी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्याकांड:

9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करत, पोलिस अधीक्षकांची बदली व एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीची घोषणा केली.

कोण आहेत नवनीत कांवत?

मूळ राजस्थानचे असलेले नवनीत कांवत हे 2017 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिक्षणात सर्वसामान्य असूनही त्यांनी मेहनतीच्या जोरावर आयआयटी परीक्षेत यश मिळवत बीटेक पूर्ण केले. आयआयटीनंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिझायनर म्हणून काम केले. मात्र, प्रशासन सेवेत जाण्याची इच्छा असल्याने त्यांनी यूपीएससीची तयारी केली आणि 2017 मध्ये आयपीएस म्हणून निवड झाली.

नवनीत कांवत यांनी लोणावळा आणि छत्रपती संभाजीनगर येथे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता बीडमधील वाढती गुन्हेगारी मोडून काढणे आणि कायदा सुव्यवस्था सुधारणे हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले की, या हत्याकांडात कोणाचाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी नेमण्यात आली आहे. ही चौकशी 3 ते 6 महिन्यांत पूर्ण होईल.

बीड जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा:

नवीन पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे साम्राज्य मोडून काढले जाईल, अशी अपेक्षाव्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

661 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क