प्रमोद सोनवणे प्रतिनिधी /कन्नड: तालुक्यातील वासडी परिसरात बिबट्यांचे सतत दर्शन आणि हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निकम वस्ती येथे गट क्रमांक 477 मध्ये भागवत रामदास निकम या शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गाईवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला.
भागवत निकम यांनी सहा वाजता गुरांना चारापाणी करून घरी परतल्यानंतर सातच्या सुमारास गाईंचा ओरडण्याचा आवाज ऐकला. गोठ्यात धाव घेतल्यानंतर त्यांनी बिबट्याला गाईवर हल्ला करताना पाहिले. गाईच्या ओरडण्यामुळे दोन जनावरांनीही हंबरडा फोडला. निकम यांनी आरडाओरड केल्याने शेजारी-पाजारी गोठ्याकडे धावले, मात्र तोपर्यंत बिबट्या उसाच्या शेतात पळून गेला.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, बिबट्यांच्या सततच्या दर्शनामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
वन विभागाने या भागातील बिबट्यांच्या हालचालींची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती स्थानिक शेतकरी करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*