मुंबई: लाडकी बहीण योजनेतील अर्ज छाननी प्रक्रियेमुळे लाखो लाभार्थींवर गदा येण्याची शक्यता आहे. सध्या याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. योजनेअंतर्गत अर्जांची तपासणी करून निकषांची पूर्तता न करणारे अर्ज बाद होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कॅबिनेट बैठकीनंतर यासंबंधीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की, “लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे, मात्र शासन निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्ज सरसकट बाद होणार नाहीत, पण ठराविक निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जांवर कारवाई केली जाईल.”
अर्ज बाद होण्याची कारणे:
1. उत्पन्न मर्यादा: वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांचे अर्ज बाद होतील.
2. वाहन मालकी: दुचाकी किंवा चारचाकी असणाऱ्या कुटुंबातील अर्जदार अपात्र ठरतील.
3. दुहेरी अर्ज: एकाच व्यक्तीकडून दोन अर्ज करण्यात आले असल्यास एक अर्ज बाद केला जाईल.
4. आधार-खाते विसंगती: आधार कार्ड व बँक खात्याचे नाव जुळत नसल्यास लाभ मिळणार नाही.
5. नोकरी करणाऱ्या महिलांना अपात्रता: योजनेचा लाभ केवळ बेरोजगार महिलांसाठी आहे.
योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, पात्रता सिद्ध करण्यासाठी प्रत्येक अर्जदाराची माहिती बारकाईने तपासली जाणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*