(प्रमोद सोनवणे) कन्नड/ प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षाला अधिक बळकटी आणि मजबुती देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, संभाजीनगर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि सोशल मीडिया प्रमुख म्हणून तपोवन येथील गणेश मच्छिंद्र नागरे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष श्री. संजय खंबायते आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. अमोल जाधव यांच्या हस्ते गणेश नागरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गणेश नागरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गणेश नागरे यांनी यावेळी पक्षाच्या उद्दिष्टांनुसार कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, पक्षाच्या विकासात आपला पूर्ण योगदान देणार असल्याचे सांगितले. या निवडीमुळे भाजप युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*