छत्रपती संभाजीनगर मनपाचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्त्वाखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी महापौर दाम्पत्याचा शिवसेनेत समावेश करण्यात आला.
शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत, पक्षासाठी अखंड सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रवेशाने छत्रपती संभाजीनगरातील राजकीय वातावरणात नवा रंग भरला आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरातील विकासकामांना गती देण्याचे व पक्षबांधणीसाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*