छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची खळबळजनक घटना घडली आहे. १७ वर्षीय नम्रता गणेश शेरकर हिचा खवड्या डोंगरावरून २०० फूट खोल ढकलून खून करण्यात आला आहे. तिचा चुलत भाऊ ऋषिकेश तानाजी शेरकर (वय २५) याने ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.
अंबड तालुक्यातील शहागड येथील रहिवासी नम्रता शेरकर काही दिवसांपूर्वी घरातून पळून गेली होती. तिच्या जीवाला धोका असल्याची तक्रार तिने शहागड पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला छत्रपती संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते.
आज, तिचा चुलत भाऊ ऋषिकेश तिला गोड बोलून खवड्या डोंगरावर घेऊन गेला. डोंगरावर नेल्यानंतर त्याने तिला २०० फूट खोल ढकलून दिले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिस तपास आणि अटक:
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात ही हत्या नम्रता शेरकरच्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*