एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. सपोनि पाचोळे व त्यांच्या टीमने प्रोझोन मॉल परिसरात सापळा रचून चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
सय्यद शोएब ऊर्फ गुडडू सादीक अली (वय 25, रा. हर्सुल, जहांगिर कॉलनी) असे संशयित व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे सापडलेली मोटारसायकल हर्सुल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत त्याने सिडको आणि अन्य भागातून चोरी केलेल्या 14 मोटारसायकलींचा कबुलीजवाब दिला आहे.
चोरीच्या मोटारसायकली विकत घेणारे इसमही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.शेख वाजीद शेख शफीक (वय 42, रा. रशिदपुरा), शहेबाज शेख हमीद शेख (वय 22, रा. जहांगिर कॉलनी) असे आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू आहे. तपास अधिकारी पोहेकॉ संजय नंद प्रकरणाचा पुढीलतपास करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*