छत्रपती संभाजी नगर : चेलीपुरा येथील प्रसिद्ध महावीर घर संसार मॉलमध्ये रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की मॉलमधील सर्व सामान काही तासांतच भस्मसात झाले. रात्री ३ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीसाठी अग्निशमन दलाच्या ७ ते ८ बंबांचा वापर करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*