छत्रपती संभाजीनगर: वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त मा. श्री. प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामागचा उद्देश नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे, अपघाताचे प्रमाण कमी करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे आहे.
रेल्वे स्टेशन चौकात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांचा पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थी, महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षा व बस वाहनांवर प्रवासी माहिती असणारे स्टिकर लावण्यात आले. नायलॉन मांजापासून संरक्षणासाठी ३०० वाहनांवर सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे.
यावेळी “स्टार हेल्मेट शॉपी”चे नासेर चाऊस यांच्या सहकार्याने गरजू वाहनचालक आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, वाहतूक शाखा-२ चे अधिकारी डॉ. विवेक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी अपघात टाळण्यासाठी मद्यपान किंवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालवू नये, असेही बजावले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*