वैजापूर: जमिनीच्या बांधाच्या भावकी मध्ये वादातून झालेल्या वादाचे रुपांतर हत्येमध्ये झाले. चिंचडगाव येथील बसस्थानकाजवळ ६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सुनील कडूबा वाघ (३०, रा. चिंचडगाव) यांचा काठी व चापट बुक्क्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला.
या प्रकरणात विजय पुंजाहरी वाघ आणि पोपट ऊर्फ भावड्या लहानू वाघ (दोघेही रा. चिंचडगाव) यांच्यावर हत्या केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जमिनीच्या बांधाच्या वादातून संशयित विजय वाघ व पोपट वाघ यांनी काठी व चापट बुक्क्यांनी सुनील वाघ यांना मारहाण केली. या हल्ल्यात सुनील वाघ यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
हिम्मत नारायण भोसले (रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय वाघ व पोपट वाघ यांच्याविरोधात विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*