सिल्लोड : तालुक्यातील आझाद नगर येथे कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट झाला. या घटनेत तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून एका शेळीचा मृत्यू झाला आहे. रात्री 11 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शेख आझम नबी शेख (वय 35), नबी अमीर शेख (वय 56), आणि शेख असद अकील (वय 12, सर्व रा. आझाद नगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघातानंतर जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना कशी घडली?
स्थानिकांच्या माहितीनुसार, एमएच ०९ जी ५७०० क्रमांकाच्या कारमध्ये गॅस भरताना तिसऱ्या सिलेंडरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरला गेला. यामुळे गॅस किटचा स्फोट झाला आणि वाहनाने पेट घेतला. शेख आझम शेख यांनी आपल्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडीतून उतरताना तेही भाजले गेले. स्थानिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. या स्फोटात बकरीचा मृत्यू झाला.
गॅस भरताना अनधिकृतता?
गॅस रिफिलिंग करताना सुरक्षा नियमांचे पालन झाले का, याची तपासणी सुरू आहे. गॅस भरणे वैध होते का, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गॅस भरणाऱ्या व्यक्तीला याचा अंदाज न लागल्याने हा स्फोट घडल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच डॉ. राम मोहिते यांनी जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या अपघातामुळे गॅस रिफिलिंगच्या प्रक्रियेत सुरक्षा उपायांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*