प्रतिनिधि/कन्नड (प्रमोद सोनवणे): सर्व समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या आणि समाजाला शिक्षणाचा मौलिक संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत भगवान बाबांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे (शास्त्री) यांनी काल्याच्या कीर्तनाद्वारे भगवान बाबांच्या कार्याचा गौरव करत समाजप्रबोधन केले.

गावागावातून टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन करत भगवानगडावर दिंड्या निघाल्या होत्या. या प्रसंगी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख केतन राजे, भा.ज.पा.चे प्रा. डॉ. संजय गव्हाणे, सरचिटणीस गणेश घुगे, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते राजू मोकाशे, माजी सभापती आप्पाराव घुगे, भगवानगड अध्यक्ष सुधीर घुगे, युवा कार्यकर्ते हरीश वाघ, सरपंच गणेश बोंगाणे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी भगवान बाबांच्या कार्याची महती गात, सर्व जाती-धर्मातील भक्तांनी एकत्र येऊन सामूहिकतेचा संदेश दिला. कार्यक्रमात कचरू जंगम, ज्ञानेश्वर ताटे, देवमन घुगे, दीपक आखाडे, गजानन घुगे, भगवानराव गीते, नारायण सोनवणे यांच्यासह असंख्य भक्तगण उपस्थित होते.

कार्यक्रम भक्तिरसपूर्ण वातावरणात पार पडला आणि भगवान बाबांच्या विचारांची प्रेरणा घेण्याचा संदेश देत भाविकांनी समाधानी भावनेने निरोप घेतला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

60 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क