छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वाकांक्षी पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगरमधील ६०० महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना ७० टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. २० टक्के रक्कम सरकारकडून देण्यात येईल, तर अर्जदार महिलांनी १० टक्के रक्कम स्वतः भरायची आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.
योजनेचा उद्देश
या योजनेचा उद्देश महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे व त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. योजनेतून मिळणाऱ्या अत्याधुनिक ई-रिक्षा महिलांना चांगले उत्पन्न मिळविण्यास मदत करतील.
अर्जासाठी अटी आणि कागदपत्रे
- अर्जदार महिला वयोगट २० ते ४० वर्षे असणे आवश्यक.
- आधारकार्ड, वयाचा पुरावा, आणि उत्पन्नाचा दाखला अशा कागदपत्रांची आवश्यकता असेल.
- योजनेच्या लाभार्थी महिलांनाच ही रिक्षा चालवावी लागेल.
महिलांसाठी नवीन संधी
महिलांसाठी नवी दिशा आणि उत्पन्नाचे साधन निर्माण करणारी पिंक ई-रिक्षा योजना छत्रपती संभाजीनगरमधील ६०० महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*