छत्रपती संभाजीनगर: उस्मानपुऱ्यातील भाजीवालीबाई पुतळ्याजवळील अपार्टमेंटमध्ये बीसीएच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची गळा कापून हत्या झाल्याची थरारक घटना मंगळवारी (१४ जानेवारी) रात्री घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
माजलगाव येथील प्रदीप विश्वनाथ निपटे (१९) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो देवगिरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता आणि आपल्या मावसभावासह ३ मित्रांसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. घटनेच्या वेळी प्रदीप फ्लॅटमध्ये एकटाच होता.
मित्र बाहेर, मारेकऱ्यांनी साधला डाव
मंगळवारी सायंकाळी प्रदीपचे मित्र आणि मावसभाऊ बाहेर गेले होते. रात्री १० च्या सुमारास ते परतल्यानंतर त्यांना प्रदीपवर काही काळ लक्ष गेले नाही. मात्र प्रदीप अर्धा तास उठत नसल्याने एकाने पांघरूण बाजूला केले आणि गळा कापलेल्या अवस्थेत रक्तबंबाळ मृतदेह पाहून धक्का बसला.
पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनेचा तपास सुरू असून हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शहरात खळबळ
या हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*