शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपयात पीक विमा उतरविला आहे. संभाजीनगर जिल्ह्यात 9 लाख 10 हजार 838 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून, त्यांनी आपल्या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.
पूर्वी शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 700 ते 2000 रुपये खर्च करून पीक विमा उतरवावा लागत होता. मात्र, नव्या बदलांनुसार केवळ 1 रुपयात हा विमा उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतकरी सोयाबीन, मका, कापूस, तूर, उडीद आणि इतर खरीप पिकांचे संरक्षण करू शकतील.
सध्या संभाजीनगर जिल्ह्यात 5 लाख 44 हजार 749 हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिके नोंदवण्यात आली आहेत. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी 9 लाख 10 हजार 838 रुपयांचा भरणा कंपनीकडे केला आहे. अतिवृष्टी, रोगराई तसेच इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*