मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापासूनच त्यांची तब्येत खालावत चालली होती, त्यामुळे समर्थकांनी त्यांना वारंवार उपचार घेण्याची विनंती केली होती. अखेर, मध्यरात्री पावणेदोन वाजता त्यांनी डॉक्टरांकडून सलाईन लावून उपचार स्वीकारले.
जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी हे उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या काळात त्यांना चालणेही कठीण होऊ लागले असून, काल स्टेजवरून खाली उतरताना ते अचानक खाली बसले आणि त्यांना उठणे अशक्य झाले होते.
जरांगे पाटील यांचे हे सहावे उपोषण असून, मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारकडून कोणता प्रतिसाद येतो, याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*