छत्रपती संभाजीनगरातील उस्मानपूरा येथील प्रसिद्ध तारा पान सेंटरचे मालक हाजी शरफोद्दीन सिद्दीकी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पान प्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेले हाजी शरफोद्दीन यांचा मनमिळावू स्वभाव आणि त्यांच्या पानाचे अनोखे स्वाद हे त्यांच्या व्यवसायाची खासियत होती.
हाजी शरफोद्दीन यांच्यामुळे तारा पान सेंटरची ओळख राज्यभरात पसरली होती. त्यांच्या दुकानात मिळणारे कोहिनूर पान हे विशेष आकर्षण ठरले. कोहिनूर पान हे कपलसाठी खास बनवले जात असे, ज्याबद्दल अनेक दावे आणि चर्चांचा माहोल होता. या पानाचे अनोखे तंत्र आणि साहित्य केवळ सिद्दीकी यांच्याजवळ होते.
हाजी शरफोद्दीन यांनी पान विक्रीचा वारसा आपल्या आईकडून घेतला होता. त्यांच्या निधनाने पान प्रेमींमध्ये शोककळा पसरलीआहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*