मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती घडवणारा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत साकार होणार आहे. अग्रगण्य इलेक्ट्रीक कार आणि कमर्शियल व्हेईकल उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी या ठिकाणी तब्बल ६३६ एकर जमिनीवर आपला भव्य प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी २७ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, यामुळे मराठवाड्यात रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल.

ऑरिक सिटीच्या बिडकीन डिएमआयसी क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष ५ हजार २०० आणि अप्रत्यक्ष १५ हजार असे एकूण २० हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. गुरूवारी ऑरिक प्रशासनाने जेएसडब्ल्यूला भूखंडाचे देय पत्र दिल्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा ओघ वाढत चालला

टोयोटा किर्लोस्कर, एथर एनर्जी आणि लुब्रिझोल यांसारख्या कंपन्यांनी आधीच बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आपले प्रकल्प सुरू केले असून, आता जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटीच्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्याचा औद्योगिक चेहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाडा आता देशाच्या अग्रगण्य औद्योगिक केंद्रांमध्ये गणला जाणार आहे.

मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला नवा वेग

राज्यसरकार आणि सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे हे प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत. जेएसडब्ल्यूच्या या गुंतवणुकीमुळे मराठवाड्याचे औद्योगिक भविष्य उज्ज्वल होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

972 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क