छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा यात्रेतून चोरलेली दुचाकी विक्रीसाठी कर्णपुरा मैदानावर आणलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. २४ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपींकडून चोरीच्या एकूण १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, कर्णपुरा मैदानावर दोन जण चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून विना क्रमांकाच्या दुचाकीसह दोन आरोपींना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींची नावे अजय विजय वाकडे (वय २२) आणि कैफ रफीक शेख (वय २०, दोघे रा. तोंडोळी, बिडकीन, ता. पैठण) अशी आहेत.
प्राथमिक चौकशीत त्यांनी ही दुचाकी कर्णपुरा यात्रेदरम्यान चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, त्यांनी विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून इतरही दुचाकी चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपींच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
पकडण्यात आलेला अजय वाकडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील पाच दुचाकी पैठण, छावणी, चिकलठाणा, सिडको आणि जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्या होत्या.
ही कारवाई एपीआय रविकांत गच्चे, जमादार प्रकाश गायकवाड, शाम आडे, संतोष भानुसे, संतोष चौरे, अश्वलिंग होनराव, नितीन देशमुख, अशरफ सय्यद आणि ज्ञानेश्वर पवार यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*