बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी (१० डिसेंबर) सकल हिंदू जागरण समितीतर्फे भव्य हिंदू न्याययात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे इस्कॉन संस्थेतील संतांची सुटका तसेच बांगलादेशातील मानवाधिकारांचे रक्षण करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
शहरातील तब्बल १०० ठिकाणांहून हिंदू न्याययात्रा काढली जाईल आणि सकाळी १० वाजेपर्यंत सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमणार आहेत. यानंतर शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल, अशी माहिती ग्लोबल महानुभाव संघाचे अध्यक्ष सुदर्शन कपाटे महाराज यांनी दिली.
इस्कॉनचे डॉ. रमेश लड्डा, विनोद बगडिया आणि सुशील भारुका यांनी सांगितले की, बांगलादेशात हिंदू समुदायावरील अत्याचार आणि मानवाधिकार हनन थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांततादूत त्या देशात पाठवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
हिंदू समाज एकत्र येण्याचे आवाहन
श्री. कपाटे महाराज यांनी सर्व हिंदूंना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या न्यायासाठी हा लढा असून, त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असे ते म्हणाले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*