छत्रपती संभाजीनगर : लसणाच्या किरकोळ आणि होलसेल दरात प्रचंड वाढ झाल्याने सामान्य ग्राहक आणि गृहिणींच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वी दीडशे रुपये किलोने विकला जाणारा साधा लसूण आता तीनशे रुपये किलोच्या दराने विकला जात आहे, तर गावरान लसणाने पाचशे रुपये किलोचा टप्पा गाठला आहे.
जाधववाडी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावरान लसणाचा महिनाभरापूर्वीचा भाव २५० रुपये किलो होता. मात्र आवक कमी झाल्याने दर दुपटीने वाढले आहेत. सध्या स्थानिक शेतकऱ्यांकडून लसणाची आवक झालेली नाही, तसेच बाहेरच्या राज्यांतून येणारा लसूणही कमी प्रमाणात मिळत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, भाजीपाल्याचे दरही झपाट्याने वाढत असल्याने सामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. भेंडी, टोमॅटो, कोथिंबीर, वांगी यासारख्या भाजीपाल्यांच्या दरांत भरमसाठ वाढ झाल्याने गृहिणींच्या खरेदीत मोठी घट दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांतही लसणाचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*