रांजणगाव पोळ (ता. अंबड) येथे श्री काशी विश्वनाथ महाराजांच्या दत्त जयंतीनिमित्त भरणाऱ्या भव्य यात्रेचा समारोप कुस्तीच्या रंगतदार महासंग्रामाने झाला. या यात्रेच्या पहिल्या दिवशी पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, तर दुसऱ्या दिवशी कुस्तीचे दमदार सामने रंगले.
या स्पर्धांमध्ये विजेत्यांना हॅन्सी भाऊ मित्र मंडळाच्या वतीने रोख बक्षिसे व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. बैलगाडा शर्यतीपासून कुस्तीपर्यंतच्या विविध कार्यक्रमांमध्ये परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
यात्रेचे आयोजन व व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू नरोडे, बद्रीभाऊ गुंजाळ, राहुल कुऱ्हाडे, शरद कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर दळे, प्रवीण गुंजाळ, अन्सार शेख, माऊली कुऱ्हाडे, सुरेश कुऱ्हाडे, उमर शेख, प्रसाद कुऱ्हाडे, गणेश कुऱ्हाडे, माऊली गायकवाड, राहुल दरेकर, किशोर कुऱ्हाडे, राजू कुऱ्हाडे, विकास गोतांडे, रमेश बोरसे, जय प्रधान, नदीम सय्यद, अवि गायकवाड, कुणाल बोडखे, संतोष कुऱ्हाडे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
या यात्रेच्या निमित्ताने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक खेळांना मिळालेला प्रतिसाद हा ग्रामीण संस्कृतीचा जिवंत साक्षात्कार ठरला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*