राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना वरदान ठरत असून, आतापर्यंत महावितरणने १,०१,४६२ सौर कृषी पंप बसवून या योजनेचा टप्पा गाठला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज तुटवड्याच्या समस्येवर तोडगा मिळत असून दिवसा सिंचनासाठी सहज उपलब्धता होत आहे.

यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. जालना जिल्हा १५,९४० पंपांसह पहिल्या स्थानी असून बीड जिल्ह्यात १४,७०५ पंप बसवण्यात आले आहेत. त्यानंतर परभणी (९,३३४), अहिल्यानगर (७६३०), छत्रपती संभाजीनगर (६२६७) आणि हिंगोली (६०१४) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देत शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरण्याचे प्रावधान केले आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी हा हिस्सा फक्त ५ टक्के ठेवण्यात आला आहे.

सौर कृषी पंपांची वैशिष्ट्ये आणि फायदे:

  • सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मितीची हमी.
  • पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी, दिवसा कधीही सिंचनाची सुविधा.
  • केंद्र व राज्य सरकारच्या ९०% अनुदानामुळे कमी खर्चात पंपांचा लाभ.

 

राज्य सरकारने साडेदहा लाख सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

350 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क