छत्रपती संभाजीनगर : संशयाच्या सुईने एका सुखी संसाराची राखरांगोळी केली. पतीच्या संशयातून पत्नीची लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सातारा परिसरातील महूनगर येथे घडली आहे. या प्रकरणी पती विठ्ठल वाघ याच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल वाघ आणि भारती यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. सुरुवातीचे काही महिने आनंदात गेले. मात्र, पती विठ्ठलने भारतीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. या सततच्या वादामुळे भारती माहेरी राहायला गेली होती.
१६ डिसेंबर रोजी सकाळी भारतीच्या आई, भाऊ आणि वहिनी बाहेर गेले होते. त्या वेळी भारती घरात एकटी होती. दुपारी एक वाजता विठ्ठल वाघ भारतीच्या घरी आला. पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात विठ्ठलने लोखंडी रॉडने भारतीच्या डोक्यात जोरदार वार केले. या हल्ल्यात भारती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. घटनेनंतर विठ्ठल वाघ फरार झाला.
शेजाऱ्यांनी भारतीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. भारतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सातारा पोलीस ठाण्यात आरोपी विठ्ठल वाघविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*