उस्मानपुरा परिसरातील जीओ कंपनीच्या स्टोअरमध्ये चोरट्यांनी शटर उचकटून तब्बल ११ लाख ४१ हजार ३९० रुपयांचे ६३ मोबाईल आणि १३ हजार रुपये रोख रक्कम चोरली आहे. ही घटना १३ डिसेंबर रोजी पहाटे ३.२६ ते ३.४० वाजता, अवघ्या १४ मिनिटांत घडली.
घटनेची माहिती मिळताच क्लस्टर मॅनेजर महेश गुंडीगुडे यांनी स्टोअरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये एक चोरटा पहाटे ३.२६ वाजता शटर उचकटून स्टोअरमध्ये प्रवेश करत असल्याचे, तसेच ३.४० वाजता चोरी केलेले मोबाईल गोणीमध्ये भरून बाहेर जात असल्याचे दिसून आले आहे.
या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*