शहरातील खोकडपुरा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये शनिवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या टंकलेखन परीक्षेत खऱ्या परीक्षार्थींच्या जागी तीन तरुणांनी परीक्षा देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
परीक्षेदरम्यान हॉलतिकीट तपासणीच्या वेळी हे तीन विद्यार्थी बोगस असल्याचे समोर आले. परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब तात्काळ क्रांतीचौक पोलिसांना कळवली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी दोन टंकलेखन सेंटरच्या संचालकांसह तीन डमी परीक्षार्थी आणि मूळ परीक्षार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ६६८ विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार उघड झाल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींच्या विरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*