महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन वीज बिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी लकी ड्रॉ योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोन व स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
महावितरणच्या या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरलेले सर्व लघुदाब ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक वेळा वीज बिल भरणाऱ्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
कोण पात्र ठरतील?
१ एप्रिल २०२४ पूर्वी एक वर्षात (१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४) ज्या ग्राहकांनी ऑनलाइन वीज बिल भरणा केलेला नाही किंवा ऑफलाइन पद्धतीने भरणा केला आहे, ते ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरतील.
लकी ड्रॉची रचना:
एप्रिल, मे आणि जून २०२५ या महिन्यांत महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर प्रत्येकी एक लकी ड्रॉ काढण्यात येईल. प्रत्येक ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच दिले जाणार आहेत.
ऑनलाइन भरणा कसा कराल?
योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस या पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करून सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा वीज बिल भरावे लागेल. यासाठी वीज बिलाची किमान रक्कम १०० रुपये असणे आवश्यक आहे.
ग्राहकांसाठी अतिरिक्त सुविधा:
महावितरणने संकेतस्थळ व मोबाइल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने वीज बिल भरण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांना ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूटही दिली जाते. परिणामी, सध्या ७०% पेक्षा जास्त ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरत आहेत.
रांगेची कटकट टाळा:
ऑनलाइन वीज बिल भरण्यामुळे ग्राहकांना वीज कार्यालयाच्या रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही. महावितरणच्या या योजनेने डिजिटल पद्धतीने वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*