छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शहरातील महापालिकेकडून संभाव्य रुग्णांची तपासणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर घाटी रुग्णालयाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ३३ खाटांचे आयसीयू आणि वॉर्ड कोरोना रुग्णांसाठी सज्ज केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता सोमवारी घाटी रुग्णालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना रुग्णांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून, उपचारासाठी लागणाऱ्या सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ‘आरटीपीसीआर’ तपासणी, ऑक्सिजनची उपलब्धता, औषधांचा साठा आणि रुग्णवाहिकांची तयारी यावर भर दिला जात आहे.
कोरोना संशयित रुग्ण रुग्णालयात आल्यास त्वरित ‘स्वॅब’ घेऊन तपासणी केली जाणार आहे. याशिवाय लक्षणे दिसून आल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी खबरदारीचे उपाय
आरोग्य विभागाने नागरिकांना मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे यासारख्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच खोकला किंवा शिंका आल्यास तोंड झाकण्याची शिष्टाचार पाळावेत. ताप, खोकला, घसा दुखणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*