छत्रपती संभाजीनगर : वातावरणातील अचानक बदलामुळे शहरात व्हायरल फ्लूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखी यासारख्या लक्षणांनी त्रस्त रुग्णांची संख्या शहरातील विविध रुग्णालये व ओपीडीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कडक उन्हाळ्यानंतर अचानक पावसाळी वातावरण निर्माण झाले. काही भागांत जोरदार पाऊसही झाला. या बदलामुळे अनेक नागरिकांना सर्दी-तापाने ग्रासले असून दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवू लागला आहे. काही नागरिक पावसात भिजल्यामुळे संसर्गजन्य आजारांना सामोरे जात आहेत.
अशी घ्या काळजी…
🔹 पावसात भिजण्याचे टाळा.
🔹 थंड पेये, आइस्क्रीम किंवा थंड पदार्थ टाळा.
🔹 वेळच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
🔹 स्वतः औषध घेण्याऐवजी तपासणी करून उपचार घ्या.
🔹 जास्त गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा.
🔹 मुलांची आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घ्या.
शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या सर्दी-तापाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याबाबत गांभीर्याने विचार करून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
आपलं आरोग्य, आपली जबाबदारी – बदलत्या हवामानात सजग राहा!
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*