छत्रपती संभाजीनगर : शहरासह संपूर्ण मराठवाड्यात थंडीची लाट काहीशी ओसरल्याचे चित्र असले, तरी अनेक भागांत अद्याप हुडहुडी कायम आहे. काही ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली असल्याने पहाटे व रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवार, २८ रोजी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असली, तरी थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागतही थंडीच्या कुडकुडीतच होण्याची चिन्हे आहेत.

शनिवार, २७ रोजी चिकलठाणा वेधशाळेत किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २९.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला, तरी सूर्यास्तानंतर थंडीचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागांत पहाटे दाट धुके आणि गार वाऱ्यांमुळे जनजीवनावर परिणाम होत आहे.

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत असून त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. शनिवारी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित मराठवाड्यात किमान तापमानात काहीशी वाढ दिसून आली असली, तरी गारठा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारपासून राज्यातील कमाल व किमान तापमानात चढ-उतार होऊ शकतो. मात्र, मध्यंतरी ओसरलेली थंडीची लाट पुन्हा सक्रिय झाली असून ३१ डिसेंबरपर्यंत हुडहुडी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी थंडीपासून संरक्षण घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

411 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क