छत्रपती संभाजीनगर: शहरवासीय सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफे लखलखत्या रोषणाईने सजले आहेत. नागरिकांसाठी स्वादिष्ट जेवणाची खास मेजवानी आणि विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पार्टीचा झगमगाट:
पंचतारांकित हॉटेलांपासून ते छोटे रेस्टॉरंट्सपर्यंत, सगळीकडे थर्टी फर्स्ट निमित्ताने खास सजावट आणि आकर्षक ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. इन हाऊस डीजेच्या सोबतीने विशेष लाईटिंग, अनलिमिटेड स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि स्वादिष्ट जेवणाने नागरिकांच्या आनंदात भर घालण्यात येत आहे.
कुटुंबीयांसाठी हुरडा पार्टी:
काही नागरिकांनी कुटुंबीय व मित्रांसह हुरडा पार्टीचे नियोजन केले असून, अनेकांनी यासाठी आगाऊ बुकिंगही केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्साही वातावरण तयार झाले आहे.
पहाटे पाच वाजेपर्यंत धमाल:
जिल्हा हॉटेल्स अँड रेस्टॉरन्ट ओनर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले की, पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांना नववर्ष साजरे करण्याची मुभा देण्यात आली आहे. कपल्ससाठी विशेष पॅकेजेस आणि स्वीट डिशेसची मेजवानीही उपलब्ध आहे.
शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, 2024 च्या निरोप आणि 2025 च्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*