छत्रपती संभाजीनगर : नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, मोठ्या लॉन्सवर रोषणाई आणि सजावटीसह पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहर व जिल्हा पोलिसांनी बंदोबस्ताचे भक्कम नियोजन केले आहे.
टवाळखोर व मद्यधुंद वाहनचालकांवर विशेष नजर
शहर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या टवाळखोरांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ८ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत १८ प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात येणार आहे. वाहन आणि चालकांची तपासणी केली जाणार असून नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
शहरातील बंदोबस्ताचा आराखडा:
- ६८ संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट
- १८ महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी
- ५० हून अधिक वाहनांमधून पोलिसांची फिरती गस्त
- गुन्हे शाखा आणि विशेष शाखेच्या साध्या वेशातील १० पथके
- ३ पोलिस उपायुक्त, ६ सहायक आयुक्तांसह १०० अधिकारी आणि १२०० कर्मचारी तैनात
मोठ्या इव्हेंट्सची जय्यत तयारी
मुंबई-पुण्याच्या धर्तीवर शहरातही प्रसिद्ध डीजे वादक आणि गायकांच्या ग्रुपला आमंत्रित करून बीड बायपास, सोलापूर-धुळे महामार्ग, केंब्रिज चौक ते शेंद्रा आणि चिकलठाणा एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
कपल एंट्रीसह सुरक्षितता सुनिश्चित
वाद टाळण्यासाठी अनेक ठिकाणी ‘कपल एंट्री’ संकल्पना लागू करण्यात आली आहे. गटात महिलांची उपस्थिती असल्यासच प्रवेश दिला जात आहे.
जवाबदारीने साजरा करा नववर्ष
नववर्षाचे स्वागत करताना मद्यधुंद वाहनचालक किंवा टवाळखोरांसाठी पोलिसांचा वचक कायम असणार आहे. नागरिकांनी जबाबदारीने व सुरक्षिततेसह नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*