छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज परिसरात भरदिवसा एका किरकोळ वादातून तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात सोहेल पटेल बशीर पटेल (२५, रा. शहाबाजार) गंभीर जखमी झाला असून, आरोपी शेख रईस (२२, रा. शहागंज) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिवी दिल्यामुळे हल्ला

सोमवारी (१३ जानेवारी) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी सोहेल हा शहागंज चौकात फळ विक्रेता असून, आरोपी रईससोबत त्याचे मैत्रीचे संबंध होते. मस्करीदरम्यान सोहेलने रईसला शिवी दिली, ज्याचा प्रचंड राग आल्याने रईस त्या ठिकाणाहून निघून गेला. मात्र, अवघ्या दहा मिनिटांतच तलवार घेऊन परत येत त्याने सोहेलवर हल्ला केला. या हल्ल्यात सोहेलच्या डाव्या पायावर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

तलवारीचा प्रताप सीसीटीव्हीत कैद

शेख रईस तलवार घेऊन पळत असताना त्याचे दृश्य राजाबाजार येथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. संक्रांतीच्या सणामुळे बाजारपेठेत गर्दी असताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक निर्मला परदेशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी केली जलद कारवाई

घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपी रईसला अटक केली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक अर्जुन कदम करत आहेत.

भरदिवसाच्या या हल्ल्यामुळे शहागंज परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,702 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क