छत्रपती संभाजीनगरात आज होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात सुमारे १ लाख नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. या मोर्चामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मोर्चाच्या मार्गावरील वाहने आणि गर्दी लक्षात घेता शहरातील प्रमुख चार मार्ग सकाळी १० वाजेपासून मोर्चा संपेपर्यंत बंद राहतील, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिली आहे.
हे मार्ग राहतील बंद:
- 1. अमरप्रीत चौक ते सेशन कोर्ट सिग्नल
- 2. गोपाल टी ते सिल्लेखाना
- 3. सिटी क्लब ते अण्णाभाऊ साठे मार्गे उद्धवराव पाटील चौक
- 4. एन-१२ सिडको विसर्जन विहीर ते पंचायत समिती कार्यालय
- 5. पंचायत समिती ते चम्पा चौकापर्यंत व तेथून पुढे चांदणे चौक मार्गे अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाचे नेते सहभागी होणार
या मोर्चामध्ये अनेक प्रमुख नेते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मनोज जरांगे, माजी खासदार संभाजीराजे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर तसेच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर सहभागी होणार आहेत.
नागरिकांनी वाहन चालवताना वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*